जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५३५ वर; २६०७ रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार २५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये १५१ पुरूष, १०१ महिला आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५५३५ झाली आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार २५२ रुग्णांमध्ये १९१ रुग्ण शहरातील तर ६१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ५५३५ वर गेला असून त्यापैकी २६६९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर २५९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्या २६०७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.
शहरातील १९१ रुग्ण या भागातील
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार १९१ रुग्ण हे शहरातील आहेत. त्यात घाटी परिसर ३, सुराणानगर १, सादातनगर २, मथुरानगर १, ज्योतीनगर २, जयसिंगपुरा १, रामनगर १, विद्यापीठ गेट परिसर १, गणेश कॉलनी १, सइदा कॉलनी १, रशीदपुरा २, लोटा कारंजा २, कांचनवाडी ६, सिडको ,एन सहा २, संभाजी कॉलनी २, संभाजीनगर २, सिडको एन अकरा १, अजबनगर १, हर्सुल परिसर ३, नूतन कॉलनी २, भाग्यनगर १, अरिहंतनगर ४, शिवाजीनगर २, एन दोन सिडको ६, मयूरनगर २, वाईकर लॉन्स परिसर १, चिकलठाणा १, सुदर्शननगर १, होनाजीनगर २, छत्रपतीनगर ३, भक्तीनगर २, पद्मपुरा २, हसनाबाद २, मातोश्रीनगर ६, हुसेन कॉलनी ३, नंदनवन कॉलनी १, नारळीबाग १, समर्थनगर १, उदय कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ६, पडेगाव १, हनुमाननगर १, एन चार सिडको ४, कोटला कॉलनी १, पुंडलिकनगर ६, संजयनगर १, एन पाच सिडको १, विठ्ठलनगर १, जय भीमनगर, टाऊन हॉल ३, रमानगर १, सिद्धार्थनगर, एन बारा १, अजिम कॉलनी, जुनाबाजार ८, हर्सुल जेल ३, भगतसिंगनगर २, साईनगर ८, टिळकनगर १, एस टी कॉलनी ठाकरेनगर १, जुनी एसटी कॉलनी १, भारत मातानगर १, स्वामी विवेकानंदनगर १, रायगडनगर १, गोकुळनगर, जाधववाडी १, मिसारवाडी १, एन बारा सिडको १, एन नऊ सिडको १, बायजीपुरा १, एन आठ, सिडको ४, पिसादेवी रोड १, मिल कॉर्नर १, भारतमातानगर १, ठाकरेनगर ३, जयभवानीनगर ५, रामनगर,एन दोन ११, साईनगर १, गजानननगर ३, उत्तमनगर ९, छत्रपतीनगर १, हडको कॉर्नर १, सूदर्शननगर ४, नाथनगर २, उस्मानपुरा, मिलिंदनगर ४, इतर २ या भागातील रुग्ण आढळून आले.
ग्रामीण भागातील ६१ रुग्ण या भागातील
ग्रामीण भागात आज ६१ रुग्ण आढळून आले आहे. त्यात सिल्लोड १, बिरगाव कासारी, सिल्लोड १, पोखरी, वैजापूर १, वैजापूर १, अश्वमेध सोसायटी, बजाजनगर २, बजाजनगर १, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर २, मृत्यूंजय सोसायटी बजाजनगर १, सिडको महानगर एक ८, दत्तकृपा सोसायटी बजाजनगर १, कोलगेट चौक, बजाजनगर १, देवदूत सोसायटी बजाजनगर १, सौदामिनी सोसायटी बजाजनगर १, बजाज विहार, बजाजनगर १, वृंदावन हॉटेल परिसर, बजाजनगर २, गंगा अपार्टमेंट, बजाजनगर १, भगतसिंग नगर परिसर, बजाजनगर १, सुवास्तू सोसायटी, बजाजनगर १, नवजीवन सोसायटी बजाजनगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर १, कांजन सोसायटी सिडको महानगर १, भगतसिंग शाळेजवळ, बजाजनगर १ दीपचैतन्य सोसायटी बजाजनगर १, न्यू दत्तकृपा सोसायटी बजाजनगर २, सिंहगड सोसायटी बजाजनगर १, मंजित प्राईड, बजाजनगर १,साईश्रद्धा पार्क बजाजनगर १, कन्नड १, औराळी, कन्नड १, कुंभेफळ २, राजीव गांधी नगर, खुलताबाद ३, इसारवाडी, पैठण २, वाळूज, गंगापूर.१, बकवालनगर, वाळूज २, कान्होबावाडी, गंगापूर १, अविनाश कॉलनी, गंगापूर १, आगवणे वस्ती, लासूर गाव १, दर्गाबेस, वैजापूर ८ या भागातील कोरोनाबाधित आहेत.
खासगी रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात शिवाजी नगरातील ५८ वर्षीय पुरूष, जुना बाजार नारायण नगरातील ६१ वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ६२, घाटीत १९६, मिनी घाटीमध्ये १ अशा एकूण २५९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.











